ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

लेकीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आलियाने केल्या भावना व्यक्त

मी ती वेळ पुन्हा जगावं जेव्हा तू फक्त काही आठवड्यांची होतीस...

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा दोन वर्षांची झाली. 6 नोव्हेंबर रोजी राहाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे. राहाचा जन्म झाल्यानंतर काही आठवड्यांनी काढलेला फोटोसुद्धा तिने चाहत्यांसोबत शेअर केला. या फोटोमध्ये आलियाने तिच्या कुशीत चिमुकल्या राहाला धरलंय आणि रणबीर अत्यंत प्रेमाने त्याच्या मुलीला न्याहाळताना दिसतोय. आलियाने हा फोटो पोस्ट करताच क्षणार्धात तो व्हायरल झाला आणि त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला.

आलियाची पोस्ट-
दोन वर्षे पूर्ण झाली आणि मला असं वाटतंय की मी ती वेळ पुन्हा जगावं जेव्हा तू फक्त काही आठवड्यांची होतीस. पण कदाचित पालक झाल्यानंतर प्रत्येकाला असंच वाटतं की तुमच्या बाळाने कायम बाळच राहिलं पाहिजे. आमच्या आयुष्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुझ्यामुळे प्रत्येक दिवस मला बर्थडे केकसारखा वाटतो, अशा शब्दांत आलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.

राहाची आजी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनीसुद्धा आलिया, रणबीर आणि नातीचा सुंदर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरची बहीण आणि राहाची आत्या रिद्धिमा कपूर सहानीनेही तिच्यासोबत फोटो पोस्ट करत शुभेच्छांचा वर्षाव केला. आलिया आणि रणबीरने एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात आलियाने राहाला जन्म दिला.

राहाच्या जन्मानंतर रणबीर आणि आलियाने तिचा चेहरा सर्वांना दाखवणं टाळलं होतं. त्यांनी पापाराझींनाही तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर गेल्याच वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी राहाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येतात. लंचच्या आधी रणबीर आणि आलिया राहाला घेऊन पापाराझींसमोर आले होते. त्यावेळी सोशल मीडियावर राहाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. राहाचे डोळे हुबेहूब रणबीरचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखेच असल्याचं नेटकरी म्हणाले होते.

मुलीचा चेहरा सर्वांसमोर न आणण्याविषयी आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती, माझ्या मुलीबद्दल कोणतीच गोष्ट बोलण्यासाठी मी सध्या कम्फर्टेबल नाही. अनेकांकडून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मला राहाची आई अशी हाक मारली जात आहे, जे मला खूपच क्युट वाटतं. पण ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे. मला खरंच असं वाटतं की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button