Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल…

पुणे : राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपणार आहे. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. यादरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली कारण येथील माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे या कालपासून नॉट रिचेबल आहेत.

सध्या राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायल मिळत आहे. यामुळे आपापल्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे आव्हान राजकीय पक्षासमोर उभे ठाकले आहे. यासाठी राजकीय पक्ष बंडखोरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

हेही वाचा    –      ‘१० दिवसांत राजीनामा द्या, अन्यथा तुमचा बाबा सिद्धिकी करू’; योगी आदित्यनाथ यांच्या नावे मुंबईत धमकी

काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देखील कमल व्यवहारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कालपासून कमल व्यवहारे नॉट रिचेबल असल्याने पक्षाची डोकेदूखी वाढली आहे.राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दोन दिवसापूर्वी बंडखोरांच्या घरी जाऊन बैठका घेतल्या होत्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कमल व्यवहारे नॉट रिचेबल असल्याने काँग्रेसचे टेन्शन वाढलं

कसबा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास महायुतीकडून भादपचे नेते हेमंत रासने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देणअयात आली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने हा सामना पाहायला मिळणार आहे. यंदा अडीच वर्षापूर्वी पोटनिवडणुकीत गमाविलेला कसबा मतदारसंघ भाजप पुन्हा ताब्यात घेणार का हे पाहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button