Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार’; भाजपा नेत्याचं विधान

मुंबई | माहीम मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढणार आहेत. तर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) येथून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपा नेमकी कोणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं आहे. यातच भाजपा नेते प्रसाद लाड यांनी माहीम विधानसभेबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनसे नेते नितीन सरदेसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अमित ठाकरे हा आमच्या कुटुंबातील मुलगा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो आणि या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करावी यावर ठाम आहोत. सदा सरवणकर हे शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. विधानसभेवरील आमदार असो, अथवा विधान परिषदेवरील आमदार असो, शेवटी आमदार हा आमदारच असतो.

हेही वाचा    –      ‘अजित पवार गट पाकीटमारांची टोळी’; जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली 

सदा सरवणकर हे कित्येक वेळा जनतेतून निवडून विधानसभेवर गेले आहेत. यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांची समजूत काढता येईल. एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना विधान परिषदेवर संधी द्यायला हवी. यासह त्यांच्याकडे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्यात आलं आहे. तसेच त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटतंय की सरवणकर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची भूमिका मान्य करतील. भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही या निवडणुकीत अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहोत, असंही प्रसाद लाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button