Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब’; रावसाहेब दानवेंचं विधान

Raosaheb Danve | सिल्लोडमध्ये जर महायुतीधर्म पाळला गेला नाही तर, मी महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांना दिला होता. यावरून आता रावसाहेब दानवे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी स्वत:ची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब दानवे यांना अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, अब्दुल सत्तार काय बोलतात ते सोडा, औरंगजेब काय बोलतो, ते मला शिवाजीला कशाला विचारता? मी शिवाजी आहे, आणि तो (अब्दुल सत्तार ) औरंगजेब आहे, असं दानवे म्हणाले.

हेही वाचा    –      महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंढ वाढ, कोणाची संपत्ती किती वाढली?

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या या विधानावर अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. अशा चिल्लर व्यक्तीबद्दल बोलण्यात मला रस नाही. शिवाजी महाराज हे राज्याचे नाही, संपूर्ण देशाचा अभिमान आहे. अशा आपल्या राजांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्यांचा मी निषेध करतो, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button