दिवाळीत सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर..
![Gold-silver prices fall on Diwali](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Gold-Silver-Rate-780x470.jpg)
Gold Silver Rate | दिवाळीला अनेक नागरिक सोने, चांदी खरेदी करत असतात. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या धातूंच्या भावात चढ-उतार होत आहेत. अशातच आता ग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर या धातुंनी मोठा दिलासा दिला आहे. तर आता आपण जाणून घेऊयात या दोन्ही धातूंचे आजचे दर..
गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट सोने ७३,३३० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७९,९५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. याशिवाय आज सकाळच्या सत्रात चांदीत मोठी घसरण झाली आहे. तर आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९८,००० रुपये झाला आहे.
हेही वाचा – झिशान सिद्दीकी व सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७८,२४५, २३ कॅरेट ७७,९३२, २२ कॅरेट सोने ७१,६७२ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५८,६८४ रुपये, १४ कॅरेट सोने ४५,७७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ९६,०८६ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.