Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

झिशान सिद्दीकी व सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी!

Zishan Siddique and Salman Khan | माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खान यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात याबाबत दूरध्वनी आला असून निर्मल नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

झिशना सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. तर धमकावणाऱ्या व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा    –    कॉसमॉस बँकेच्या ‘स्मॉल फायनान्स बिझनेस डिपार्टमेंट’चे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

दरम्यान, माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची खेरवाडी परिसरात १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेची नुकतीच पडताळणी केली असता सुरक्षा रक्षक कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळले होते. त्यामुळे पोलीस उपायुक्तांनी सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button