Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन विधानसभा : पिंपरी-चिंचवड महाविकास आघाडीत माजी आमदार विलास लांडे ‘‘किंगमेकर’’

शहरातील तीनही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार

अजित गव्हाणे यांच्या तिकीटासाठी लावली राजकीय ताकद

पिंपरी :  ‘‘मी शरद पवार यांच्या तत्त्वांवर चालणारा कार्यकर्ता आहे. त्यांना कधी सोडलेच नाही. महाविकास आघाडीसोबतच आहे. अजित गव्हाणे यांच्या तिकीटासाठी मीच पवार साहेबांकडे शब्द टाकला. तिकीट मिळवून दिले. महाविकास आघाडीचे शहरातील तीनही उमेदवार निवडून आणणार आहे,’’ असा निर्धार माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे. त्यामुळे लांडे शहर महाविकास आघाडीचे ‘किंगमेकर’ ठरले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी या मतदार संघामधून निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपने लढवला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे आमदार महेश लांडगेंना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या मतदार संघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी दावा ठोकला होता.

हेही वाचा     –      ‘जनता माझ्या पाठीशी, जगताप-कलाटे हे माझ्यासाठी आव्हान नाही’; नाना काटे 

काही दिवसांपूर्वी, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातमध्ये नाराजीचा सूर आहे.

विलास लांडेंनी भूमिका केली जाहीर…

माजी आमदार विलास लांडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. महायुतीत राहून ते मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंचा प्रचार करण्याची भूमिका विलास लांडेंनी जाहीर केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button