Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मुंबई | विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज १५ उमेदवारांची घोषणा समानामधून करण्यात आली आहे. यात शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

मतदारसंघानिहाय उमेदवार :

शिवडीमधून अजय चौधरी, धुळे शहर-अनिल गोटे, चोपडा-राजू तडवी, जळगाव शहर-जयश्री सुनील महाजन, बुलढाणा-जयश्री शेळके, दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली-रूपाली राजेश पाटील, परतूर-आसाराम बोराडे, देवळाली-योगेश घोलप, कल्याण पश्चिम-सचिन बासरे, कल्याण पूर्व-धनंजय बोडारे, वडाळा-श्रद्धा श्रीधर जाधव, भायखळा-मनोज जामसुतकर, श्रीगोंदा-अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली- संदेश भास्कर पारकर यांचा समावेश आहे.

हेही वाचा     –      शिवसेना ९०, राष्ट्रवादी ९०, काँग्रेस ९०; महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला 

दरम्यान, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group