Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

माजी खासदार निलेश राणेंचा भाजपाला रामराम; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Nilesh Rane | विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बुधवारी दुपारी कुडाळच्या मैदानावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: निलेश राणे यांनी दिली आहे.

निलेश राणे म्हणाले, मी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माझ्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. ज्या पक्षापासून माझ्या राजकारणाची सुरूवात झाली. त्याच पक्षात आता मला पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो.

हेही वाचा    –      डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा 

दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील प्रवेशानंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button