Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईत दाऊदला भेटले’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Prakash Ambedkar | शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईत दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, १९८८ ते १९९१ दरम्यान शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, या काळात शरद पवार लंडनला गेले होते. तिथून कॅलिफोर्नियाला गेले, तिथे २ दिवस थांबले. कॅलिफोर्नियात त्यांनी एक बैठक घेतली. तिथून शरद पवार लंडनला परत आले. तिथून दोन दिवसांनी ते दुबईला गेले. दुबई एअरपोर्टवर त्यांची दाऊद इब्राहिमबरोबर भेट झाली, दाऊदने त्यांना सोन्याचा हार भेट दिला, तिथून शरद पवार पुन्हा लंडनला गेले आणि भारतात परतले.

हेही वाचा    –    आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन 

केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही मुख्यमंत्र्याला विदेशात जाता येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याला त्यावेळच्या सरकारची मान्यता होती का? कॅलिफोर्नियात शरद पवार यांनी जी बैठक घेतली त्याची माहिती तत्कालिन केंद्र सरकारला होती का? आणि शरद पवार आणि दाऊद इब्राहिमच्या भेटीची सरकारला माहिती होती का? याची उत्तर केंद्र सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.

राज्यात शांतता राखायची असेल तर अशा पक्षांना मतदान करायचे की नाही, हे जनतेला ठरावावं लागेल. निवडणुकीच्या तोंडावर मी हे आरोप करतो आहे, कारण राज्यात १९९० आणि २००० दशकाची परिस्थिती पुन्हा येईल, असं दिसते आहे. गोळीबारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बाबा सिद्दीकींची उघडपणे हत्या करण्यात आली आहे. ही परिस्थिती पाहता मागचा इतिहास आपल्याला पाहायला हवा, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button