प्रियांका चोप्राचा नवरा निकवर शार्प शूटरने साधला निशाणा?
निकच्या डोक्यावर दिसली लेझर लाईट, जीव मुठीत घेऊन पळाला ,व्हिडीओ व्हायरल
![Priyanka Chopra, Husband, Nick, Sharp, Shooter, Target, Laser, Light, Jeev, Muth, ,Video,Viral,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/priyanka-chopra-780x470.jpg)
प्राग : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि पॉप स्टार निक जोनस याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निक त्याच्या सुरक्षारक्षकांना हाताने काही इशारा करत पळताना दिसत आहे. निक जोनास भाऊ केविन आणि जो जोनास यांच्यासोबत प्राग येथे मंगळवारी त्यांच्या डेज वर्ल्ड टूरचा भाग म्हणून कार्यक्रमात परफॉर्म करत होता. याच इव्हेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निक आपल्याला लेझरद्वारे लक्ष्य केलं जात असल्याचं समजल्यानंतर त्वरीत स्टेजवरून पळताना दिसला.
व्हिडीओमध्ये परफॉम करत असताना निक जोनस त्याच्या चाहत्यांकडे पाहाताना दिसत आहे. पण त्यानंतर सुरक्षारक्षकांना इशारा करत निकने स्टेजवरून पळ काढला. व्हिडीओ निकच्या एका चाहत्यांने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांची देखील चिंता वाढली आहे. तर अनेकांनी निकच्या सुरक्षेसंबंधी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘जोनस ब्रदर्सना रात्री प्राग येथील शो काही काळ बंद करावा लागला. कारण एका प्रेक्षकांमधील एका निकच्या डोक्यावर लेझर लाईटच्या माध्यमातून निशाणा साधला. त्या व्यक्तीला कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून कार्यक्रम सुरु करण्यात आला. असं लिहिलं आहे.
निकच्या डोक्यावर दिसली लेझर लाईट
निकचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निकच्या डोक्यावर लाल रंगाची लेझर लाईट दिसत आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे.
निक याचे कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. पण जोनस ब्रदर्सकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. जोनास ब्रदर्सचा शेवटचा परफॉर्मन्स रविवारी पॅरिसमध्ये होता आणि आता जोनास ब्रदर्सचा बुधवारी पोलंडमधील क्राको येथे कॉन्सर्ट आहे. प्रियांका चोप्राचे चाहतेही या घटनेमुळे खूप चिंतेत आहेत.