कृष्णा जगदाळे याची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड!
१४ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धा
![Selection of Krishna Jagdale for Divisional Cricket Tournament](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Krishna-Jagdale-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी चिंचवड पालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांचा संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धात उत्तम कामगिरी करणारा भोसरीतील डावखुरा गोलंदाज श्रीकृष्ण जगदाळे याची १४ वर्षांखालील विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कृष्णा जगदाळे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संगमनेर क्रीडा संकुल , संगमनेर येथे होणाऱ्या विभागीय निवड चाचणी स्पर्धेसाठी कृष्णाची निवड झाली आहे. १४ वर्षाखालील मुलांचा जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली. डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारा कृष्णा हा सिद्धेश्वर शाळेतील विद्यार्थी आहे. तो इयत्ता सहावीत शिकत असून, शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने सिद्धेश्वर हायस्कूल संघातून प्रतिनिधित्व केले होते.
हेही वाचा – ‘प्रधानमंत्री आवास’मधील ५ हजार सदनिकाधारांना अखेर दिलासा!
कृष्णा हा भोसरीतील आदिनाथ क्रिकेट क्लबचा खेळाडू आहे. तो दैनंदिन सराव प्रशिक्षक व वडील विजय जगदाळे यांचा मार्गदर्शनाखाली करीत आहे. या कामगिरीबद्दल शाळेची मुख्याध्यापिका सुजाता सावंत, शारीरिक शिक्षक राधा मोरे, शाळेतील शिक्षक तसेच आदिनाथ क्रिकेट क्लब मधील आशुतोष सिंग, श्रीयश जगदाळे, गणेश राठोड, निलेश उददे, विपुल सौडणे, शैलेश उगाळे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेछा देत अभिनंदन केले.