Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने ऑगस्टमध्ये भाजप आमदार नीतेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

खासदारांविरोधात बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी माजगाव कोर्टात अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीवेळी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या भाजप आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात ऑगस्टमध्ये न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.

हेही वाचा –  पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी

माजगाव न्यायालयात याप्रकरणी १७ ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी आहे. यावेळही गैरहजर राहिल्यास नीतेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. श्याम चांडक यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button