शार्दूल ठाकूरला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
मुंबईतर्फे खेळताना शार्दूलने पहिल्या डावात 36 धावा, सरफराजसोबत 9 व्या विकेटसाठी त्याने मोठी भागीदारी केली.
![Shardul Thakur, Hospital, Discharged, Mumbai, Game, Innings, Runs, Sarfraz, With, Wicket, Partner,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/sharadul-takur-780x470.jpg)
दिल्ली : इराणी चषक 2024 स्पर्धेमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरला प्रथम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यानंतर उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीची फलंदाजी संपल्यानंतर शार्दुलला रुग्णालयात नेण्यात आले. शार्दुलला खूप ताप होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र तापाने फणफणत असूनही त्याने बॅटिंग केली. मात्र त्यानंतर त्याला लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. इराणी चषक स्पर्धेत सध्या मुंबई वि. रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात सामना सुरू आहे.
शार्दुलने सरफराजसोबत केल्या 73 धावा
रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध खेळताना शार्दुल ठाकूरने 9व्या विकेटसाठी सरफराज खानसोबत 73 धावांची भागीदारी केली. पण, या खेळीदरम्यान त्याची अवस्था वाईट झाली. त्याला फलंदाजीदरम्यान उपचारासाठी दोनदा विश्रांती घ्यावी लागली. मुंबईने पहिल्या डावात 537 धावांची मोठी धावसंख्या उभारली, खालच्या फळीतील शार्दूल आणि सरफराज यांच्यातील भागीदारीने यात महत्त्वाची भूमिका बजावली.
रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
अंगात बराच ताप असूनही दुसऱ्या दिवशी देखील शार्दूलने त्याचा खेळ,फलंदाजी सुरूच ठेवली. मात्र त्या दिवसाचा खेळ संपताच त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्रभर तो हॉस्पिटलमध्येच होता, नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
शार्दूलला तापामुळे रुग्णालयात नेण्यात आले होते, तेथून त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. शार्दूल ठाकूरची रुग्णालयात रक्त तपासणी करण्यात आली.मात्र त्यात घाबरून जाण्यासारखे काहीच नाही. तिसऱ्या दिवसाअखेर शार्दूल पुन्हा संघात परत येईल, असे वृत्त आहे.
कशी बिघडली शार्दूलची तब्येत ?
इराणी चषक स्पर्धेतील मॅचच्या पहिल्या दिवसापासूनच शार्दूलची तब्येत बरी नव्हती. मात्र तरीही तो सामन्यात खेलत होता. लखनऊनधील गरम आणि दमट वातावरणात खेळताना शार्दूलची तब्येत आणखनीच बिघडली. परिणामी अखेर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मुंबईचे उर्वरित खेळाडू हॉटेलमध्ये गेले असताना शार्दूलला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.