ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत

ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय यांचे नामांतर करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यानुसार, या महाविद्यालयांना महापुरुषांचे व संबंधित जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने 14 आयटीआय यांचे नामांतर करुन 14 महान व्यक्तींची नावेदेखील या आयटीआय संस्थेसाठी देऊ केली आहेत. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यातील आयटीआयला (ITI) धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. तर, बीडमधील (Beed) आयटीआयला दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं नाव देण्यात आलं आहे.

राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडलळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. या आयटीआय कॉलेजेसला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आलं आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला राजर्षि शाहू महाराजांचे तर बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button