भारतीय आठवड्याला किती तास काम करतात? जगात कितवा क्रमांक? वाचा सविस्तर..

Most Overworked Countries in World | आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार सर्वाधिक तास काम करणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या १० देशांच्या यादीत भूतान हा पहिल्या क्रमांकावर आहे. भूताननंतर भारताचा दुसरा, तर बांगलादेशचा तिसरा क्रमांक लागतो. याशिवाय भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे.
भूतानमधील ६१ टक्के नागरिक प्रत्येक आठड्याला सरासरी ४९ तासांपेक्षा जास्त काम करतात, तर भारतातील नागरिक दर आठवड्याला सरासरी ४६.७ तास काम करतात. तसेच भारतातील ५१ टक्के नागरिक असेही आहेत, जे आठवड्याला ४९ तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात. याशिवाय बांगलादेशातील ४७ टक्के नागरिक ४९ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करतात, तर पाकिस्तानातील ४० टक्के नागरिक ४९ किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करतात.
हेही वाचा – ‘प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, मंत्रीपद सोडतो’; रामदास आठवलेंची खुली ऑफर
चीनमधील नागरिक ४६.१ तास, क्रोएशियातील नागरिक ३७.९ तास, जॉर्जियातील नागरिक ४०.५ तास, जर्मनीतील नागरिक ३४.२ तास, आयल ऑफ मॅनमधील नागरिक ३५ तास, जपानमधील नागरिक ३६.०६ तास, न्यू जर्सीतील नागरिक ४० तास आणि सिंगापूरमधील नागरिक सरासरी ४२.६ तास काम करत असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.
किरिबाटी या देशांतील नागरिकही दर आठवड्याला सरासरी २७.३ तास, तर फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया येथील नागरिक दर आठवड्याला सरासरी ३०.४ तास काम करतात. तसेच युरोपमधील नेदरलँड्समधील नागरिक सरासरी ३१.६ तास, तर नॉर्वे येथील नागरिक ३३.७ तास काम करतात.





