ताज्या घडामोडीपुणे

यशवंत हरीभक्त यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान

कात्रज मधील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयात गेल्या वीस वर्षापासून अध्यापनाचे कार्य करताहेत

पुणेः महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी प्रणित माध्यमिक शिक्षक संघ पुणे, यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 कात्रज मधील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक यशवंत हरीभक्त यांना नुकताच मिळाला. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिगंबर देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सन्माननीय दिगंबर दुर्गाडे प्रसिद्ध लेखक व शिक्षण तज्ञ यशराज पारखी टीडीएफ संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष जी. के. थोरात संघटनेचे विश्वस्त के. एम. डोमसे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिचंद्र गायकवाड, टीडीएफचे पुणे विभागीय अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामठे, सचिव सचिन दुर्गाडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, स्वर्गीय रामभाऊ, शाळेचे सचिव भालचंद्र खराईत, मुख्याध्यापिका आरती राठोड, प्रज्ञा हरिभक्त, त्याचबरोबर शिक्षक प्राध्यापक संभाजी साबळे, प्राध्यापक मल्लिनाथ वाघमोडे, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कात्रज मधील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयात यशवंत हरीभक्त गेल्या वीस वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. या दरम्यान त्यांनी स्वतःमधील असलेले कर्तृत्व, वक्तृत्व व दातृत्व या गुणांचा वापर करून ते विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. एक सुसंस्कृत नागरिक तयार करण्यासाठी ते कटिबद्ध आहेतच, त्याचबरोबर दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसाला 500 झाडे व 5000 बियांचे रोपण करून समाजाप्रतीची निष्ठा या कृतीमधून विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. अशा कृतिशील शिक्षकाला त्यामुळेच हा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button