आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते वडगावमध्ये मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाचे उद्घाटन
'नव्या कार्यालयामुळे महसूल विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल'; आमदार शेळके
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-42-2-780x470.jpg)
वडगाव मावळ : वडगावमधील तलाठी कार्यालयाच्या या नूतन इमारतीमुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना महसूल संबंधित सेवा एकाच कार्यालयात उपलब्ध होतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हक्काची प्रशस्त व सुसज्ज जागा मिळाल्याने कामामध्ये अधिक सुसूत्रता येईल,” असे मत आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले.
वडगाव शहरातील मंडल अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप
आमदार शेळके म्हणाले की,सुमारे 40 लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यालयाच्या नवीन स्वतंत्र इमारतीमुळे कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन समारंभास नायब तहसीलदार गणेश तळेकर, मंडल अधिकारी रमेश कदम, तलाठी विजय साळुंखे, माजी उपसभापती गणेशआप्पा ढोरे, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, संचालक संत तुकाराम कारखाना सुभाष जाधव, माजी जि.प.सदस्य शेखर भोसले, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, जेष्ठ नेते गंगाधर ढोरे, चंदूकाका ढोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पंढरीनाथ ढोरे, राजेंद्र म्हाळसकर, माजी नगरसेवक प्रवीण ढोरे,राजेंद्र कुडे, प्रवीण चव्हाण,पोटोबा देवस्थान विश्वस्त किरण भिलारे, प्रेमचंद बाफना तसेच शहरातील मान्यवर,आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.