ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर संजय राऊत आक्रमक

आनंद आश्रमातील लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? एक व्हिडीओ आला समोर

ठाणे : आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आनंद आश्रमातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यानंतर विरोधक शिंदेंच्या शिवसेनेवर चांगलेच निशाणा साधल आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक होत त्यांनी याप्रकऱणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ठाण्यातील आनंद आश्रमातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारा आहे. तो व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो आहोत.

एक धिंगाणा त्या वास्तूमध्ये आम्ही पाहिला आहे. लुटीचा पैसे तिथे ठेवला जातो का? लुटीच्या पैशांतून असे प्रकार केले जात आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, आश्रमात त्या ठिकाणी एक हंटर लावण्यात आले आहे. आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचा पैसे उधळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते. आनंद दिघे असे वागणाऱ्यांचा समर्थन करत नव्हते. तसेच जे आनंद दिघे यांना गुरू मानतात ते सुद्धा प्रकार करु शकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button