Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘राहुल गांधी मुस्लीम आहेत की ख्रिश्चन हे त्यांनाही माहिती नाही’; भाजपा आमदाराचं विधान

Rahul Gandhi | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेते सातत्याने जातीजनगणेची मागणी करत आहेत. मात्र, यावरून भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. अशातच कर्नाटकमधील भाजप आमदाराने राहुल गांधीबाबत एक विधान केलं आहे. राहुल गांधींना ते मुस्लीम आहे की ख्रिश्चन हेच माहिती नाही, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकच्या बीजापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसंगौडा पाटील यतनाल म्हणाले, राहुल गांधी अमेरिकेत जातात आणि देशविरोधी विधानं करतात. तर भारतात असताना ते जातीजनगणनेची मागणी करतात. मात्र, त्यांचा जन्म कोणत्या जातीत झाला, हे कुणालाही माहिती नाही. आपण मुस्लीम आहेत की ख्रिश्चन, हे स्वत: राहुल गांधी यांनाही माहिती नसेल, त्यामुळे राहुल गांधी यांची वंशावळ तपासावी.

हेही वाचा   –    ‘..तर मोदी सरकार कोसळेल’; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा 

राहुल गांधी हे आपण ब्राह्मण असल्याचे सांगतात पण ते कोणते ब्राह्मण आहे? आणि ते ब्राह्मण असतील, तर ते जानवं घालतात का? हे आधी त्यांनी सांगावं”, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच “राहुल गांधी हे देशी कट्ट्यासारखे आहेत. ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही, अशी टीकाही बसंगौडा पाटील यतनाल यांनी केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधीच्या जातीबाबत एक विधान केलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काही लोक केवळ ओबीसींबद्दल बोलत असतात. मात्र यांच्यासाठी (काँग्रेस) ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन आहे. त्याचबरोबर ज्यांची जात कोणाला माहिती नाही, तो जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करतायत. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र उत्तर द्यायला कोण उभं राहिलं ते सर्वांनी पाहिलं आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button