महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निष्कासनाची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-42-1-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत थेरगाव येथील आनंदवन सोसायटीतील अंदाजे १२१८ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या ३ अनधिकृत आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
ग क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली असून आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा – Pimpri-Chinchwad | हॉटेलमध्ये गोळीबार, अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
यावेळी उप अभियंता एस.के.अहिरे, धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक सौरभ शिरसाठ, मितुष सावंत, किरण पवार आणि विनोद बजबळकर, अतिक्रमण निरीक्षक मनिष जगताप, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५ जवान, ३ पोलीस उपनिरीक्षक, १८ पोलीस कर्मचारी, ५ ठेकेदार मजूर आदी सहभागी होते. या कारवाईसाठी जेसीबी ब्रेकर, हातोडा तसेच ट्रॅक्टर ब्रेकरचा वापर करण्यात आला.