Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लाडकी बहीण योजनेसाठी आता नवी अट, फक्त अंगणवाडीतूनच करता येणार अर्ज

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज सप्टेंबर महिन्यातही करता येणार आहेत. केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

शासनाने यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 आॉगस्ट 2024 पर्यंत मुदत होती. आता शासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा    –    पावसाचं सावट! पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार 

यापूर्वी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-सीआरपी ( मदत कक्ष प्रमुख, सीएमएम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीबाबत देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महिलांनी केवळ अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज सादर करावे, अशी माहिती रंधवे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button