ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उज्ज्वला योजनेंतर्गत राज्य शासनाची महिलांसाठी अन्नपूर्णा योजना राबविण्याची घोषणा

जिल्ह्यातील साडेसात लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र

नांदेड : उज्ज्वला योजनेतील लाभार्थी व लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींना अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन सिलिंडर भरून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिला या योजनेस पात्र ठरणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांऐवजी त्यांच्या पती किंवा कुटुंबातील अन्य कर्त्या व्यक्तींच्या नावे गॅस जोडणी आहे. त्यामुळे सुमारे पन्नास टक्के महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा विभागाकडून सध्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थींच्या केवायसीवर भर देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील महिलांना धूरमुक्त वातावरण मिळावे, गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे व महिलांचे आरोग्य सुधारावे, यासाठी २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कार्यान्वित करण्यात आली. योजनेंतर्गत तेल कंपन्यांच्या सहकार्याने महिलांना गॅस जोडणी मिळाली आहे. परंतु, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेक महिला चुलीकडे वळू लागल्या आहेत. हे समोर येताच राज्य शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र लाभार्थी व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या महिलांसाठी अन्नपूर्णा योजना राबविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ३० जुलै रोजी परिपत्रकही काढले. प्रशासनाने ही योजना तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोचविण्याची तयारी केली आहे.

जिल्ह्यातील जवळपास साडेसात लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. याच्या लाभाची रक्कम जमा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या योजनेत पात्र महिलांऐवजी कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या नावे गॅस जोडणी असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात उज्ज्वला वगळता सुमारे सात लाख ८६ हजार ०४१ गॅस जोडण्या आहेत.

यामध्ये पन्नास टक्के गॅस जोडण्या पुरुषांच्या नावे आहेत. त्यामुळे उज्ज्वला योजनेव्यतिरिक्त पन्नास टक्केच महिला यात योजनेस पात्र ठरू शकतात. उर्वरित महिला लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सर्वच पात्र महिलांना मोफत गॅस योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

आतापर्यंत ई-केवायसीचे काम ६५ टक्के पूर्ण
जिल्ह्यात विविध ऑइल कंपन्यांमार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत २ लाख ७६ हजार ७९९ गॅस जोडण्या दिल्या आहेत. त्यापैकी एक लाख ७८ हजार ७२३ लाभार्थींची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३५ टक्के लाभार्थींची अद्याप ई-केवायसी बाकी आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

थेट लाभार्थीच्या खात्यात रक्कम होणार जमा
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस उज्ज्वला योजनेतील लाभार्थी पात्र असणार आहेत. त्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावे गॅस कनेक्शन असल्यास त्या पात्र असतील. गॅस भरल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात वर्षात तीन सिलिंडरची रक्कम जमा केली जाणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत २ लाख ७६ हजार ७९९ गॅस जोडण्या दिल्या असून त्यांचे केवायसी करण्यात येत आहे. ते अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची यादी राज्य शासनाकडून अद्याप आली नाही. ती आल्यानंतर किती लाभार्थी पात्र ठरतील हे सांगता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button