तीन विधानसभा मतदार संघात 16 लाख, 14 हजार 498 मतदार…
पिंपरी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्याची अंतिम मतदार यादी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार जिल्ह्यात 44 लाख 91 हजार 68 पुरुष, 41 लाख 55 हजार 330 महिला आणि 774 तृतीयपंथीय असे एकूण 86 लाख 47 हजार 172 मतदार आहेत. तर पिंपरी चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघातील मतदरा संख्या 16 लाख, 14 हजार, 498 एवढी आहे.
हेही वाचा – Breaking News । पिंपरी-चिंचवडमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याबाबत ‘अफवा’
चिंचवड मतदार संघात 561 मतदान केंद्र, 3 लाख 39 हजार 727 पुरुष, 3 लाख 3 हजार 989 महिला आणि तृतीयपंथीय 53 असे 6 लाख 43 हजार 769 मतदार आहेत. पिंपरी (अ.जा.) मतदार संघात 398 मतदान केंद्रे, पुरुष 2 लाख 792, महिला 1 लाख 83 हजार 12 आणि तृतीयपंथीय 30 असे 3 लाख 83 हजार 834 मतदार आहेत.
भोसरी मतदार संघात 483 मतदान केंद्रे, पुरुष मतदार 3 लाख 18 हजार 578, महिला 2 लाख 68 हजार 220 आणि तृतीयपंथीय 97 असे 5 लाख 86 हजार 895 मतदार आहेत.