breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मी शिवरायांची माफी मागतो’; शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी

Narendra Modi | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी झाले होते. आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमीपूजन झालं. तसेच अनेक विकासकामांचं उद्घाटन झालं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही. ते आमचे आराध्य आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन माफी मागतो- पंतप्रधान मोदी म्हणाले. आमचे संस्कार वेगळे आहेत. वीर सावरकरांचा अनादर करणारे, देशभक्तांच्या भावना चिरडणारे आम्ही नाही.

हेही वाचा    –    पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॅान रस्त्याला ‘गती’ 

भारताचे महान सपुत वीर सावरकरांना शिव्या देतात. अपमानित करतात असे लोक आम्ही नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा करतात. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे यांचे संस्कार आहे. मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराविषयी देखील यावेळी माहिती दिली. या पोर्टवर ७६ हजार कोटीहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असेल. देशच नाही तर जगातील सर्वात मोठं पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचं किती मोठं केंद्र होईल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button