breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेच्या दोन रुग्णालयांना नोटीस

पुणे : जैव वैद्यकीय कचऱ्या संदर्भात नियमांचे पालन न केल्याबद्दल महापालिकेच्या दोन रुग्णालयांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नोटीस बजावली आहे. रुग्णालयाला नोटीस जारी केल्यापासून एका महिन्याच्या आत एक वेगळे जैव वैद्यकीय कचऱ्या संदर्भात स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश या नोटीसीतून देण्यात आले होते.

टिंबर मार्केट आणि मित्र मंडळ चौक परिसरात हे रुग्णालय आहे. एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी जे.एस. साळुंखे यांनी ही नोटीस जारी केली आहे.संबंधित रुग्णालये एक महिन्याच्या आत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम, २०१६ नुसार वेगळ्या जैव वैद्यकीय स्टोरेज सुविधा पुरवणे बंधनकारक आहे तसेच त्याचा वार्षिक अहवाल तसेच सांडपाणी प्रक्रिया सुविधेचा तपशीलही एक महिन्याच्या आत सादर करण्याच्या देखील सूचना मंडळाने दिल्या आहेत.

हेही वाचा    –    धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल, मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या 

मंडळाने रुग्णालयाला जैव वैद्यकीय स्टोरेजचे रेकॉर्ड राखून ठेवण्याला सांगितले आणि बायोमेडिकल वेस्टचे वर्गवारीनुसार विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावेपर्यंत रंगीत कोडेड पिशव्यांमध्ये साठवून ठेवण्यासही सांगितले आहे.बायो मेडिकल वेस्टची पूर्तता न केल्याबद्दल मित्र मंडळ चौक परिसरात असलेल्या रुग्णालयाला देखील मे महिन्याच्या सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस देऊनही रुग्णालयाने निकषांचे पालन केले नाही.

जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९७४ च्या कलम ३३ ए आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या ३१ ए अंतर्गत अंतरिम निर्देश.रुग्णालयांना जारी करण्यात आले. उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्तावही सादर केला होता. रुग्णालयलावरील निर्देशांनुसार सात दिवसांच्या आत कृती अहवाल सादर करण्यास सांगितले होते आणि अपयशी झाल्यास, मंडळ प्रक्रियेनुसार पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button