breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पोलीस आमदारांची गाडी धुताना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

Sanjay Gaikwad | बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ फेसबुकवरुन पोस्ट केला आहे. संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात त्यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडल्याचा दावा सपकाळ यांनी केला. यावर टीका करताना पोलिसांचं काम सुरक्षेचं आहे की आमदरांच्या गाड्या धुणं असा सवालही सपकाळांनी उपस्थित केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एकटा पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभी असलेली गाडी धुताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या अंगावर खाकी आहे. म्हणजेच कर्तव्यावर असताना तो हे काम करत होता. हा व्हिडीओ पोस्ट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? अशी विचारणा केली आहे. तसंच पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हेही वाचा    –    धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल, मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या 

पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिलं आहे की, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र पोलीस शर्म करो! सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी?. दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं! मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का? आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे..! पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button