breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपाच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कचरावेचक व्यक्तींच्या पाल्यांसाठी  शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या विषयासह  महापालिका सभा  आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये  पार पडलेल्या  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असलेले व कचरावेचकांचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांचे जीवनमान उंचविण्याच्या तसेच त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून  महापालिकेच्या वतीने शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या योजनेस प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकत असलेल्या कचरावेचक पालकांच्या पाल्यांना वार्षिक ४ हजार रुपये अर्थसहाय्य महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.   तसेच  इयत्ता  ८ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना  ६ हजार रुपये वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

अर्जदाराने अर्जासोबत महापालिका हद्दीमधील आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीमधील मतदार ओळखपत्र  किंवा मतदार यादीची प्रत (पालकांची ) या दोन्हींपैकी एक पुरावा जोडणे गरजेचे आहे.  विद्यार्थ्यांची मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिकेची प्रत, सध्याच्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. कचरावेचक पालक  नोंदणीकृत कचरावेचक संघटनेचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत जोडणे आवश्यक आहे.  या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना ई.सी.एस.द्वारे देण्यात येणार असल्याने अर्जदाराने स्वतःचे अथवा पालकांच्या  नावे बँक खाते असलेले अद्ययावत पासबुकची प्रत अर्जासोबत  जोडणे आवश्यक आहे.  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागासवर्गीय  कल्याणकारी योजना किंवा इतर कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्ती देणे यापैकी एकाच योजनेचा लाभ देय राहिल, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

हेही वाचा    –    राजकोट किल्ल्यावर ठाकरे विरुद्ध राणे मध्ये जोरदार राडा, जोरदार घोषणाबाजी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या कचरावेचकांच्या पाल्यांच्या  शिक्षणासाठी वार्षिक बक्षिस रक्कम देणे.इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरावेचक पालकांच्या पाल्यास अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य् शिक्षण मंडळाच्या माध्यमिक (एस.एस.सी.) व उच्च माध्यमिक (एच.एस.सी.)परीक्षा उतीर्ण  विद्यार्थ्यांना  तसेच आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.सी.) आणि आय.सी.एस.सी अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील कचरावेचकांच्या मुलांसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १० वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.  सी.बी.एस.सी. बोर्ड तसेच आय.सी.एस.सी. बोर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १० वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना  ५ हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १२  वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना  महापालिकेच्या वतीने १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.  सी.बी.एस.सी. बोर्ड तसेच आय.सी.एस.सी. बोर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना  ७ हजार ५००  रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

महापालिका परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती अदा करणे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणाच्या दृष्टीने सुशोभीकरणाची कामे करणे, भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील रस्त्याची स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे,  मनुष्यबळ तसेच यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेचे  कामकाज करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आदी विषयांसह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button