breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही; काशिनाथ नखाते

पिंपरी | नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरामध्ये ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या डामडौलात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चे अनावरण करण्यात आले मात्र केवळ ८ महिन्यातच हा पुतळा कोसळला यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमी मध्ये प्रचंड नाराजी आहे केवळ टक्केवारीत अडकलेल्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण असून शिवछत्रपतींचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असे मत कामगार नेते काशिनाथ खाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज थरमॅक्स चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, तुषार घाटुळे, सुरेश देडे ,व्यांकाप्पा जाधव, राहुल जामदार,सचिन नागणे,लाला राठोड,जीवन कदम, सलीम डांगे ,यासीन शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा    –    ‘पुतळा कोसळणं हा अपघात, वाईटातून चांगलं घडायचं असेल, यासाठी अपघात’; दीपक केसरकरांच्या दाव्यानं वादाची शक्यता 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा ४३ फूट उंचीचा होता मात्र कोसळला . महाराष्ट्रातील अथवा देशातील कुठल्याही पुतळा कोसळणे हे वेदना जनक असून ते गंजून झाले अथवा निकृष्ट दर्जामुळे झाले याला सर्वस्वी सरकार व व्यवस्था जबाबदार असून हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेले आहे यावर मुख्यमंत्री म्हणतात की प्रति तास ४५ किलोमीटर वेगाने हवा होती म्हणून पुतळा कोसळला मात्र मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावे की अशा किती हवा आल्या आणि किती वारे आले तरी महाराष्ट्रातील एकही पुतळा अशा पध्दतीने कोसळलेला नाही मात्र हा शिवछत्रपतींचा पुतळा केवळ घाई गडबडीत आणि लवकर उद्घाटन करायचे म्हणून त्याच्या दर्जाकडे लक्ष दिले गेले नाही म्हणून कोसळला हा समस्त शिवप्रेमींचा अवमान असून हा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही हा पुतळा तातडीने उभा करण्यात यावा. व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button