क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी विजय

रोमरियो शेफर्ड याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात

मुंबई : वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी 20 सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला होता. विंडिजचा हा अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. विंडिजने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र विंडिजच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेचा डाव 19.4 ओव्हरमध्ये 149 धावांवर आटोपला. विंडिजने या विजयासह 2-0 अशा फरकाने मालिकेत आघाडी घेतली. विंडिजच्या फलंदाज आणि गोलंदाजंनी दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामिगरी करत विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.

दक्षिण आफ्रिकेच्या रियान रिकेल्टन आणि रिझा हेंड्रक्स या सलामी जोडीने दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करुन दिली. रियानने 20 कर रिझाने 44 धावांची खेळी केली.मात्र या दोघांनंतंर दक्षिण आफ्रिकेच्या इतर कोणत्याही फलंदाजाला काही खास करता आलं नाही. शामर जोसेफ आणि रोमरियो शेफर्ड या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या मिडल ऑर्डरला सुरंग लावला. या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. रोमरियो शेफर्ड याने 4 ओव्हरमध्ये 15 धावांच्या मोबदल्यात तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. ट्रिस्टन स्टब्स याने 28 धावांचं योगदान दिलं. मात्र त्या धावा दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा नव्हत्या.

त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडिजने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 179 धावा केल्या. विंडिजसाठी शाई होप याने सर्वाधिक केल्या. होपने 41 धावांचं योगदान गिलं. तर कॅप्टन रोव्हमॅन पॉवेल याने 35 रन्स केल्या. शेरफेन रूदरफोर्ड याने अखेरीस 29 धावा जोडल्या. या तिघांनी केलेल्या खेळीमुळे विंडिजला सन्मानजनक धावांपर्यंत पोहचता आलं.

विंडिजचा विजय

वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अलिक अथानाझे, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोती, मॅथ्यू फोर्ड आणि शामर जोसेफ. दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डोनोव्हन फेरेरा, पॅट्रिक क्रुगर, ब्योर्न फॉर्च्युइन, लिझाड विल्यम्स, क्वेना माफाका आणि ओटनील बार्टमन.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button