breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणणारच’; माजी महापौर कविचंद भाट

पिंपरी : भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर पिंपरी चिंचवड शहरात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त असे निदर्शनात येते. पुन्हा शहराचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा आमदार निवडून आणणारच हा संकल्प करावा, असे मत माजी महापौर कविचंद भाट यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि. 25) पक्ष कार्यालयात माजी महापौर कविचंद भाट व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा   –      पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी ताब्यात 

यावेळी ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, राजाराम भोंडवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभाग सरचिटणीस अमर नाणेकर, प्रदेश कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष वाहब शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुध्द कांबळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर, अल्पसंख्यांक विभागाचे शहाबुद्दीन शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष ॲड. अशोक धायगुडे, डॉक्टर सेल अध्यक्षा डॉ. मनिषा गरुड, शहर उपाध्यक्ष स्मिता पवार-मुलाणी, रशिद अत्तार, महेश बिराजदार पाटील, भिमराव जाधव, शहर सरचिटणीस मुन्साफअली खान, वसंत वावरे, शहर सचिव ॲड. मोहन अडसूळ, युवक कॉंग्रेस प्रवक्ता विशाल कसबे, आदींसह शहर काँग्रेस मधील आजी-माजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कविचंद भाट म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती ही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून झालेली असून अनेक मोठे प्रकल्प काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात तयार झाले आहेत, त्याचा उपयोग आज शहवासीयांना होत आहे. शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन नागरिकांची सेवा करावी ,अशी सूचना दिली.

यावेळी ओबीसी विभाग शहर प्रमुख पदी सोमनाथ शेळके, अनुसूचित जाती विभाग शहर प्रमुख पदी हिरामण खवळे, अनुसूचित जाती विभाग शहर कार्याध्यक्ष हर्षल ओव्हाळ, दक्षिण भारतीय सेल शहर प्रमुख पदी जॉर्ज मॅथ्यु, इंटक शहर प्रमुख तुषार पाटील, शहर उपाध्यक्ष मेहबूब मलिक, चिंचवड विधानसभा ब्लॉक उपाध्यक्षा अरुणा वानखेडे, सामाजिक सलोखा अभियान पिंपरी चिंचवड समन्वयक म्हणून राजन नायर यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button