breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काटे वस्ती-पुनावळे येथे शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजार!

भाजपाचे नवनाथ ढवळे, राहुल काटे यांचा पुढाकार : आमदार अश्विनी जगताप यांच्याहस्ते उद्घाटन

पिंपरी : सर्वसामान्य नागरिक, सोसायटीधारकांना सवलतीच्या दरामध्ये ताज्या भाजा आणि फळे उपलब्ध व्हावीत. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून कृषी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी. या करिता काटे वस्ती- पुनावळे येथे ‘आठवडा बाजार’ सुरू करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याहस्ते या आठवडे बाजाराचे लोकार्पण करण्यात आले. भाजपाचे उपाध्यक्ष नवनाथ ढवळे आणि थेरगाव मंडल उपाध्यक्ष राहुल काटे यांच्या पुढाकाराने हा आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा –  लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली अपडेट

यावेळी कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते सुनील ढवळे, दिलीप काटे, कामगार नेते सुरेश रानवडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास काटे, बाळासाहेब काटे, अतुल काटे, पुणे व्हिलेज सोसायटीचे चेअरमन अमित गोरे यांच्यासह ग्रामस्थ व सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिक, सोसायटीधारकांना सवलतीच्या दरामध्ये ताजी कृषी उत्पादने उपलब्ध झाली पाहिजेत. यासाठी शेतकरी आठवडा बाजार ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरत आहे. नव्याने विकसित झालेल्या पुनावळे भागात मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे या भागात पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे पुरवण्याबाबत आम्ही सकारात्मक भूमिकेतून काम करीत आहोत.

– अश्विनी जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button