breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मविआ’चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरु आहेत. अशातच आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यात जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे. याबाबत महाविकास आघाडीतील इतर पक्ष सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 20 ते 22 जागांवर दावा ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा –  तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात; ‘लखपती दीदीं’शी साधणार संवाद

बैठकीनंतर सूत्राकडून अशी माहिती समोर येत आहे की, महाविकास आघाडीत मुंबईत शिवसेना ठाकरे गट जागा वाटपात मोठा भाऊ असेल. यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सकारात्मक असल्याचे कळते आहे. शिवसेना ठाकरे गटाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांसाठी आग्रह धरला आहे. काँग्रेस पक्ष हा 13 ते 15 जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट 5 ते 7 जागांवर निवडणुक लढवेल. मात्र अद्याप काही जागा संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही.

मुंबईतील काही जागांवर महाविकास आघाडीतील दोन्ही तर काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपात 2019 मध्ये जिंकलेल्या जागा सोडून उर्वरित जागांवर इच्छुक उमेदवार आणि त्या पक्षाची ताकद यावर चर्चा झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button