breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसतर्फे महिला अत्याचाराचा जाहीर निषेध

पिंपरी : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर, तसेच बदलापूर, अकोला व पुणे येथे अल्पवयीन निरागस मुलींवर झालेल्या बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या विरोधात पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मुक मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. हे निषेध आंदोलन शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

पिंपळे निलक येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक मोर्चा दरम्यान हातात मेनबत्या घेऊन परिसरात निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. हा कॅन्डल निषेध मार्चा भैरवनाथ मंदिर ते पिंपळे निलक बस स्टॉप पर्यंत काढण्यात आला याप्रसंगी मेणबत्त्या प्रज्वलित करून अत्याचार पीडितांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हेही वाचा   –      आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो; जयंत पाटलांचा भाजपला इशारा 

यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सह प्रभारी आसाम राज्य मा. पृथ्वीराज साठे माजी नगरसेवक निगार ताई बारस्कर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआ उपाध्यक्ष उमेश खंधारे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, महिला काँग्रेस उपाध्यक्षा आशा भोसले, स्वयंरोजगार विभागाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया पोहारे, महिला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका सगट, स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, आबा खराडे,प्रज्ञाताई वाव्हळकर, मृणाल ताई साठे शोभाताई जगताप (सामाजिक कार्यकर्त्या), सुषमा वाघमारे, सविता कांबळे, संगिता कांबळे, शोभा कांबळे, कौशल्या आवडे, परिवहन विभागाच्या उपाध्यक्षा स्वाती शिंदे, जय ठोंबरे, तन्मेश इंगावले तसेच महिला पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्त्या उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button