breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

सोन्याच्या किंमतीत वाढ! जाणून घ्या सोने व चांदीच्या किंमती

Gold Silver Rate | सोन्याने या आठवड्यात जोरदार आघाडी घेतली आहे. तर चांदीने दरवाढीला आवर घातला आहे. मात्र आज सोने व चांदीचे दर काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.. या आठवड्यात सोन्याने ६०० रुपयांची भरारी घेतली आहे. मात्र आज गुडरिटर्न्सनुसार २२ कॅरेट सोने ६७,२६० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,३६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यात चांदीने ४००० रुपयांची उसळी घेतली होती. सोमवारी आणि बुधवारी किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. मंगळवारी २० ऑगस्ट रोजी चांदी एक हजार रुपयांनी वधारली होती. आज २२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात किंमती १०० रुपयांनी स्वस्त झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ८६,९०० रुपये आहे.

हेही वाचा      –      आता राज्यात लाडका शेतकरी अभियान राबवणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), २४ कॅरेट सोने ७१,७१९, २३ कॅरेट ७१,४३२, २२ कॅरेट सोने ६५,६९५ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५३,७८९ रुपये, १४ कॅरेट सोने ४१,९५६ रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८४,९१३ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button