breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक!

मुंबई | बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तब्बल १० तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. वारंवार प्रयत्न करुनही सरकारला त्यांची समजूत काढता आली नाही. शेवटी लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजूला करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर नाना पटोले यांनी ही घोषणा केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला आरसा दाखवण्याचे काम जनता करेल.

हेही वाचा     –      सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सणासुदीत नोकरदारांचा महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, बदलापूर घटनेनं महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली असून आंदोलन करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्याचे आम्ही ठरवले आहे.

दरम्यान, बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या मुख्य आरोपीला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याला पुन्हा २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. बदलापुरातील नामांकीत शाळेतील दोन चिमुकल्यांवर अक्षयनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button