breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

२१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

Bharat Band | सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीकडून विरोध केला जातो आहे. त्यापार्श्वभूमीवर या समितीकडून उद्या २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये बसपा, चंद्रशेखर आझादची पार्टी सहभागी झाली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. याशिवाय कोणत्याही ठिकाणी हिंसाचार घडू नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना हायअर्लटवर ठेवण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी आरक्षणात क्रिमी लेयर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्याला खरंच त्याची गरज आहे, त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी, यासाठी हा निर्णय देण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला. दलित संघटनांकडून या निर्णयाला विरोध केला जातो आहे. हा एकप्रकारे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. याविरोधात संघटनांकडून उद्या मंगळवारी २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

हेही वाचा    –      ..तर सरकारनं मला फाशी द्यावी; बदलापुरातील घटनेनंतर सुप्रिया सुळे आक्रमक

काय सुरू, काय बंद?

दुकानं, व्यावसायिक आस्थापनं बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वच व्यापारी संघटना या बंदला समर्थन करत नसल्याने काही आस्थापनं सुरू राहू शकतात. याशिवाय बॅंक, सरकारी कार्यालये, शाळाही सुरु राहणार असल्याची माहिती आहे. तसेच, रुग्णालयं आणि औषधांची दुकाने यासारख्या आपत्कालीन सेवा देखील सुरू राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button