ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महावितरणाच्या गलथान व नियोजन शून्य कारभाराविरोधी नागरिकांचा जनआक्रोश धडक मोर्चा

पोलिस बंदोबस्तात मोहन नगर पासून थरमॅक्स चौकातील महावितरण कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा

पिंपरी-चिंचवडः विजेच्या लपंडावामुळे या विभागातील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच विभागामध्ये अनेक नागरिकांना डेंग्यू, चिकनगुनियाची लागण होऊन ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. या विभागात लाईट नसल्यामुळे चोऱ्यामाऱ्या वाढल्या असून, या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे.अशा महावितरणच्या गलथान व नियोजन शून्य कारभारामुळेच अनेक नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरी जावे लागत आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे म्हणून अनेकांनी वेगवेगळी निवेदना महावितरणला यापूर्वी दिली होती. मात्र यावर कायमस्वरूपी कुठलाही उपाय निघाला नाही. त्यामुळे मंगळवार दि.२०/०८/२०२४ रोजी श्री दत्त मंदिर चौक मोहन नगर येथून सकाळी ११.००वा.वरील सर्व नगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या वतीने सहा मागण्यांसाठी”जन आक्रोश धडक मोर्चा ” आयोजित केला होता. हा मोर्चा मोहननगर येथून सुरू झाला. मोहन नगर पासून थरमॅक्स चौकातील महावितरण कार्यालयापर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोहननगर, चिंचवड स्टेशन, आनंद नगर, साईबाबानगर, गवळीवाडा, इंदिरानगर काळभोर नगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, परशुरामनगर आदि परिसरातील महावितरणचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. या

हा मोर्चा मोहननगर महात्मा फुले नगर दत्तनगर विद्यानगर, शंकरनगर, रामनगर, परशुराम नगर मार्गे महावितरणच्या थरमॅक्स चौकातील आकुर्डी विभागीय कार्यालया धडकला. त्यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता अतुल देवकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव हे मोर्च्याच्या सामोरे आले त्यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले त्यावर मोर्चाच्या ६ मागण्यांबाबत प्रत्येक मुद्दा निहाय लेखी पत्र दिले.या मोर्चामध्ये सामाजिक राजकीय व्यापार लघुउद्योजक हातगाडी पथारी टपरी धारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button