ताज्या घडामोडीदेश-विदेश

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात चकमक

सीआरपीएफच्या पथकावर गोळीबार, एक जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफमधील इस्पेक्टर शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांसोबतची ही चकमक उधमपूरमधील डुडू तालुक्यातील चिल परिसरात झाली. डीआयजी मोहम्मद भट सोमवारी दुपारी ३च्या सुमारास सुरक्षा दलासोबत गस्त लावत असताना दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.

या चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा पाडाव करण्यासाठी सर्च अॅण्ड डेस्टॉय ऑपरेशन सुरू केले. या ऑपरेशन दरम्यान सीआरपीएफमधील इस्पेक्टर कुलदीप सिंह हे शहीद झाले. ते हरियाणाचे होते. सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत असताना शेतात लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. सुरुवातीला दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला.

दहशतवाद्यांच्या गोळीबारात कुलदीप सिंह यांना गोळी लागली होती. रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर घटनास्थळी अतिरिक्त पथक पाठवण्यात आले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला तेथून पोलिस चौकी फक्त ८ किलोमीटर दूर आहे.

गेल्या काही महिन्यात उधमपूर जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. ही बाब जम्मू विभागासाठी काळजीचा विषय ठरत आहे. गेल्या काही महिन्यात जम्मू् विभागात दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत आहे. जुलै महिन्यात डोडा जिल्ह्यात लष्कारातील एका अधिकाऱ्यासह ४ जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद झाले होते.या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित कश्मीर टायगर्सने घेतली होती.

राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन दोनच दिवस झाले आहेत. १० वर्षानंतर जम्मू्-काश्मीरमध्ये निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने राज्यात ३ टप्प्यात मतदान घेणार असल्याचे जाहीर केले असून. राज्यात १८, २५ आणि १ ऑक्टोबर अशा तारखांना मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. विधानसभेच्या ९० जागांवर निवडणूक होत असून यापैकी ७४ जागा खुल्या, ९ एसटी आणि ७ जागा एसीसाठी आरक्षीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button