breaking-newsTOP Newsपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीयसंपादकीय विभाग

Ground Report । माजी नगरसेवक वसंत बोराटेंचा एक चुकीचा निर्णय अन्‌ मोशीमध्ये निलेश बोराटेंचा ‘राजकीय उदय’

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी : सोसायटीधारकांसह गावकी-भावकीमध्ये मोठी ‘कनेक्टिव्हीटी’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात विधानसभा पातळीवर उलथापालथ सुरू असतानाच, आगामी महानगरपालिका निवडणुकीची धांदलही यानिमित्ताने सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत आपले तिकीट आणि मनपा सभागृहातील प्रवेश निश्चित करण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. किंबहुना, ‘‘विधानसभेत कुणाचा रोष नको… आपली जागा सेफ करु…’’ असा काहीसा सावध पवित्रा अनेकांनी घेतला. पण, याला काही अपवादही आहेत. मोशीतील निलेश बोराटे यांनी राजकीय संधीचा फायदा घेत, प्रभागात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत निलेश ‘महायुती’च्या पॅनेलचा निर्णायक चेहरा राहतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘समाविष्ट गावांचा विकास’ या मुद्यावर भोसरीतील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी २०१४ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली. मोशी-चऱ्होली-चिखली या भागातील मतदारांनी निर्णायक आघाडी दिली. त्यामुळे लांडगेंच्या विजय सोपा झाला. २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून माजी महापौर राहुल जाधव, अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे आणि वसंत बोराटे असे चार नगरसेवक भाजपाच्या तिकीटावर निवडून आले.

महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिले महापौरपद चऱ्होलीमध्ये नितीन काळजे यांच्या रुपाने देण्यात आले. त्यानंतर राहुल जाधव यांना संधी मिळाली. तत्कालीन भाजपाचे दिग्गज नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी आपआपल्या समर्थकांना महत्त्वाच्या पदावर संधी देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वसंत बोराटे यांना स्थायी समिती अथवा महत्त्वाच्या पदावर संधी देता आली नाही. अगदी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही त्यांनी मागणी केली होती. आमदार लांडगे यांनी त्यांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर सदस्य म्हणून वर्णी लावली, मात्र वसंत बोराटे भाजपात मन रमले नाहीत.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाली. त्यावेळी भाजपातील कोणीही नगरसेवक महाविकास आघाडीत प्रवेशकर्ता झाला नाही. पण, वसंत बाेराटे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करीत आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली. किंबहुना, त्या नंतरच्या काळात प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर लांडगेंविरोधात आरोपांचा सूर धरला होता. वसंत बोराटे यांच्यामुळे मोशीत महेश लांडगे यांचा ‘बालेकिल्ला’ ढासळणार, असा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला होता. मात्र, निलेश बोराटे यांनी या राजकीय चर्चेला छेद दिला. वसंत बोराटे यांच्यामुळे निर्माण झालेली स्पेस भरुन काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सोसायटीधारकांच्या समस्या, प्रभागातील प्रलंबित विकासकामे आणि राजकीय कार्यक्रम-उपक्रमांचा सपाटा लावला. गेल्या दोन वर्षांतील त्यांचे सातत्य हिच शक्ती निर्माण झाली आणि आजच्या घडीला मोशीत ‘स्ट्राँग लीडरशीप’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. अत्यंत शांत-संयमी आणि शिस्तप्रिय असा चेहरा महेश लांडगे यांच्यामुळे मोशीकरांच्या समोर आला किंबहुना निलेश बोराटे यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. वसंत बोराटे यांचा एक निर्णय आणि निलेश बोराटे यांचा राजकीय उदय अशी चर्चा परिसरात होवू लागली आहे.

महेश लांडगेंची साथ, निलेश बोराटेंची गाडी सुसाट…

आजच्या घडीला निलेश बोराटे यांच्याकडे आमदार महेश लांडगे यांचा कट्टर समर्थक म्हणून पाहिले जाते. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी बोराटे यांना शुभेच्छा दिल्या. विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून व आमदार लांडगे यांच्या सहकार्याने निलेश बोराटे यांनी परिसरातील घराघरात स्थान मिळवले. राजकारणात नवख्या पण महेश लांडगेंची साथ मिळाल्यामुळे निलेश बोराटे यांची गाडी सुसाट सुटली आहे, असे चित्र पहायला मिळत आहे. कारण, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे यांच्यासह युवा नेते निखिल बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे यांच्या हातात हात घालून निलेश बोराटे एकजुटीने काम करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button