breaking-newsताज्या घडामोडी

वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावल्यास पडेल महागात! सरकार वसूल करणार ‘तब्बल’ इतकी जीएसटी

Fancy Number Plate GST | जर तुम्ही तुमच्या कारसाठी फॅन्सी किंवा स्पेशल नंबर घेण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण वाहनांमध्ये फॅन्सी नंबर प्लेट लावल्यास सरकार २८% जीएसटी लागू करणार आहे.

फॅन्सी नंबर प्लेट बसवण्यावर जीएसटी वसूल करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. विशेष क्रमांकांना लक्झरी वस्तू मानून त्यावर २८ टक्के जीएसटी आकारला जावे का याबाबत अर्थ मंत्रालयाला विचारण्यात आले आहे.

हेही वाचा      –        खासदार अमोल कोल्हे यांचे एक ‘स्टेटमेंट’ अन्‌ महाविकास आघाडीचा ‘सेल्फ गोल’

फील्ड फॉर्मेशन्सने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला पाठवला आहे. फील्ड फॉर्मेशन्सने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाला पत्र लिहून म्हटले आहे की ही एक लक्झरी वस्तू आहे ज्यावर २८% जीएसटी आकारला जावा. फील्ड फॉर्मेशन ही राज्ये आणि झोनमधील केंद्र सरकारची कार्यालये आहेत, जी कर गोळा करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button