breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळावा झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या आरक्षणाबाबत निर्णय घेणास असल्याचं सांगितले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाज शतकानुशतके समाजातील अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक, समाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरक्षणाच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत टिकाणारे निर्णय घेण्यात येणार आहेत. मराठा समाजातील तरूणांनी नोकरी देणारे व्हावे. एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे काम महामंडळाने केले आहे. ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.

हेही वाचा      –        ‘माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा 

मराठा समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जवळपास ८२५ कोटी व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान अतिशय चांगले राहिले आहे. महामंडळाने बँकांच्या सहकार्याने आणखी पाच लाख उद्योजक बनवावेत आणि या उद्योजकांनी २५ लाख नोकऱ्या द्याव्यात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘सारथी’सारख्या संस्थांच्या निर्मितीने गरीब शेतकऱ्यांच्या, मराठा समाजातील सर्वसामान्यांच्या तरुणांना स्पर्धा परीक्षांचे दालन उपलब्ध करून दिले आहे. समाज, समाजातील तरुण यांच्या विकासासाठी कार्ययोजना करणे आवश्यक असते; ते ‘सारथी’ने करून दाखविले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केल्याप्रमाणे सातारा येथे मराठा समाजातील तरुणांसाठी वसतिगृह उभे करून दिले जाईल. प्रशासनाने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे सांगून शासनाने एक हजार ६०० कोटी रुपये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला आहे. ५०७ विविध अभ्यासक्रम मुलींसाठी विनामूल्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button