breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात; बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचा भारताला इशारा!

Sheikh Hasina | शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. शेख हसीना युरोप किंवा अमेरिकेत आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. शेख हसीना यांना भारतात आश्रय दिल्यावरून हसीना यांच्या कट्टर विरोधक खलेदा झिया यांचा राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे, तसेच भारताला इशारा दिला आहे.

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते गयेश्वर रॉय म्हणाले, बांग्लादेश आणि भारत यांच्यातील परस्पर सहकार्याचे बीएनपी पक्ष समर्थन करतो. पण जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत करत असाल तर या परस्पर सहकार्याचा आदर करणे कठीण होईल. तसेच, शेख हसीना यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भारताने पाठिंबा दिलेला आहे, याबद्दलही त्यांना चिंता वाटत असल्याचं गयेश्वर रॉय म्हणाले.

हेही वाचा      –      हडपसर येथे खाजगी बसला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

भारत सध्या शेख हसीना यांची जबाबदारी उचलत आहे. भारत आणि बांगलादेशमधील लोकांचे एकमेकांशी वैर नाही. पण भारताने संपूर्ण देशापेक्षा एकाच पक्षाला (अवाली लीग) उचलून धरणे योग्य आहे का? असा सवालही गयेश्वर रॉय यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून ८ ऑगस्ट रोजी शपथ घेतली. मोहम्मद युनूस यांच्यासह एकूण १५ सदस्यांनी शपथ घेतली आहे. शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर आता बांगलादेशमध्ये शांततेच्या वातावरणात नवीन सरकार स्थापन करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button