Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Ground Report । माजी आमदार विलास लांडे हेच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘अनभिषिक्त सम्राट’

महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजुंनी ‘‘रेड कार्पेट’’ : अजित पवार गटात असताना शरद पवार गटाच्या बॅनरवर ‘झळकले’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ‘अनभिषिक्त सम्राट’ असलेले माजी आमदार विलास लांडे यांचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये सलग दोनला आमदार राहिलेले लांडे यांना बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजुंना ‘रेड कार्पेट’ आहे.

जुलै- २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरात कधी अजित पवार, तर कधी शरद पवार यांच्या व्यासपीठावर पहायला मिळणारे माजी आमदार विलास लांडे यांनी ‘पॉलिटिकल बॅलन्स’ साधाला होता.

दरम्यान, माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी आता लांडेसुद्धा अजित पवारांची साथ सोडणार, अशी चर्चा होती. परंतु, पक्षप्रवेश केवळ अजित गव्हाणे आणि समर्थकांचा झाला. लांडे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला किंबहुना पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत लक्षवेधी भाषणही केले होते.

शिव स्वराज्य यात्रेचा पहिला ‘शो’ लांडेवाडीत…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत शानदार यश मिळाले. पक्षाने निवडणूक लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा संकल्प आकुर्डी येथे झालेल्या ‘विजयी संकल्प’ सभेत करण्यात आला. त्यानंतर लगेचच आता पक्षाकडून ‘शिव स्वराज्य यात्रा’ किल्ले शिवनेरीवरुन सुरू होत आहे. या यात्रेची धुरा शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खाद्यावर आहे. या यात्रेचा पहिला ‘शो’ भोसरीमध्ये अर्थात लांडेवाडी येथे होत आहे. लांडेवाडी किंबहुना भोसरी हा लांडे यांचा बालेकिल्ला आहे.

लांडे नव्हे, त्यांच्याकडील एकगट्टा मते महत्त्वाची…

भोसरी विधानसभा मतदार संघातील इच्छुक माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जोरदार ‘ब्रँडिंग’ केले आहे. या फ्लेक्सवर माजी आमदार विलास लांडे यांचा फोटो झळकतो आहे. अजित पवार गटात असतानाही लांडे महाविकास आघाडीला आपल्या ‘प्रोटोकॉल’मध्ये हवे आहेत. यावरुन ‘‘अजित गव्हाणे एकट्याने निवडणूक लढवू शकत नाहीत’’ त्यासाठी लांडे यांची साथ त्यांना महत्त्वाची वाटते, यावर शिक्कामोर्तब होते. किमान एकगट्टा ६० हजार मतांचे धनी असलेले विलास लांडे यामुळेच लांडे महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी ‘संकटमोचक’ वाटतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button