breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

भारताला सर्वात मोठा धक्का! विनेश फोगट ऑलम्पिक मधून बाहेर

Vinesh Phogat | भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आलं आहे. विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यानंत तिच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही आणि ५० किलोमध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते असतील. आजच या निर्णयाची घोषणा होऊ शकते.

हेही वाचा    –      राज्यात झिकाची रूग्णसंख्या ८० वर; पुण्यात सर्वाधिक ६६ रुग्ण 

‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button