breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात झिकाची रूग्णसंख्या ८० वर; पुण्यात सर्वाधिक ६६ रुग्ण

पुणे | राज्यभरात झिकाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार पसरताना दिसत आहेत. राज्यात झिका व्हायरसचे ८० रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे ६६ रूग्ण हे पुणे शहरातील आहेत, तर पुण्यापाठोपाठ पुणे ग्रामीण त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये कमी रूग्णसंख्या आहे.

झिका व्हायरसचे राज्यात आत्तापर्यंत एकूण ८० रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६६ रूग्ण पुणे शहरातील आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीणध्ये ५, पिंपरी-चिंचवडमधील २, अहमदनगरमधील ४, सांगलीमधील १, कोल्हापूर १ आणि सोलापूर १ अशी रूग्णसंख्या आहे. झिका व्हायरसचा धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे.

हेही वाचा     –        पिंपरी-चिंचवडकरांनो, अर्थसंकल्पासाठी ‘ऑनलाइन’ विकासकामे सूचवा

झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत?

झिका व्हायरसने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात. शहरात आढळलेल्या झिकाच्या रूग्णांमध्ये ताप, उलट्या, जुलाब, अशक्तपणा अशी लक्षणे सर्व रुग्णांना सारखी आढळून आल्याची माहिती आहे.

काय काळजी घ्यावी?

झिकाची लक्षणे दिसली तरी घाबरून जाऊ नये. ताप आल्यास दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यास एनआयव्हीकडून रक्त जलनमुन्यांची तपासणी करून घ्यावी. साचलेले पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नये. डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button