‘लाडक्या बहिणी’ला मुंबई हायकोर्टात आव्हान, पहिल्या हप्त्यावर मंगळवारी निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-81-780x470.jpg)
मुंबई : लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंट यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात यासंबंधीची याचिका सादर केली आहे. या याचिकेत लाडकी बहीण योजना का? हा तर करदात्यांच्या पैश्यांचा अपव्यव आहे असा मुद्दा या उपस्थित करण्यात आला आहे.
लाडकी बहीणी योजनेविरोधातील या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास, तसेच लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी याचिकेवर सुनावणीस एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने याचिकाकर्त्याची विनंती मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.
हेही याचा – मनोज जरांगेंच्या भेटीला 3 भाजप आमदारांची धडक
लाडकी बहिण योजना का? हा तर करदात्यांच्या पैश्याचा अपव्यव असून या योजनेमुळे तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. तसेच 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणा-या योजनेच्या पहिल्या हफ्त्यावर तात्काळ स्थिगीतीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली होती. आता सदर याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची काही दिवासांपूर्वी घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार आहे. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार असल्याची टीका केली जात आहे.