breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘रिक्षा चालकांवर एकतर्फी कारवाई केल्यास विधानसभेत धडा शिकवू’; बाबा कांबळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, रिक्षा चालक आणि वाहतुकदारांचे प्रश्न मांडणार

‘चाकण पोलिस स्टेशन हद्दीतील रिक्षा चालकांवर होणारी चुकीची कारवाई थांबवा’; बाबा कांबळे

पिंपरी : चाकण या औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना राबवणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक कोंडीच्या नावाखाली सर्वसामान्य रिक्षा चालकांवर कारवाईचा फार्स नको. प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांना त्रास नको याचीही दक्षता प्रशासनाने घ्यावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतपेटीच्या द्वारे धडा शिकवू यापूर्वी देखील लोकप्रतिनिधी यांनी रिक्षा चालकांना मारहाण केली होती या घटनेचा रिक्षा चालकांनी निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव केला हे उदाहरण समोर आहे, यामुळे रिक्षा चालकांना कमजोर समजू नका, असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अशा चालकांच्या समस्या व प्रश्न मांडणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चाकण हा औद्योगिक पट्टा आहे. या ठिकाणी रस्त्याच्या विस्तारीकरणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंत्रालयात बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर तोडगा काढा. लक्ष द्या अशा सूचना केल्या आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला पाहिजे. त्यासाठी रिक्षा चालक मालक सहकार्य करायला तयार आहे. मात्र चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने रिक्षा ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. जे रिक्षा चालक प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांना देखील कारवाईला तोंड द्यावे लागत आहे. ज्यांच्याकडे परवाना (लायसन) बॅच परमिट व सर्व प्रकारचे कागदपत्रे आहेत, अशा रिक्षा चालकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा    –      पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांसाठी उद्योगपती सज्जन जिंदाल यांची मोठी घोषणा! 

सध्या रिक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले असून पुरी पिंपरी चिंचवड आरटीओ अंतर्गत फक्त 5000 रिक्षा होते आता ४० हजार पेक्षा झाले आहेत या रिक्षा वाढण्याला सरकारच्या चुकीचे धोरण जबाबदार आहे ज्या रिक्षांना परवाना लायसन बॅच दिले आहे त्यांना रिक्षा स्टँड साठी जागा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रशासनाचे व अधिकारी यांचे कर्तव्य आहे, चाकण परिसरामध्ये आम्ही विविध ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड साठी जागेची मागणी केली असताना देखील याबाबत रिक्षाच्या जागा उपलब्ध करून दिली गेली नाही,

हे प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. वाहतूक कोंडीचा बळी रिक्षा चालक नको, अशा प्रकारची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे. वाहतुकीला शिस्त लागावी या मताशी आम्ही सहमत असून वाहतूक कोंडीच्या नावाखाली गोरगरीब रिक्षा चालकांना मात्र त्रास होऊ नये, असे मत मांडणार आहे. असे झाल्यास आम्ही गोरगरीब विठ्ठलाच्या बाजूने ठामपणे उभे राहू असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.

चाकण येथील रिक्षा चालकांवरती चाकण पोलीस स्टेशन कारवाई सुरू असून त्यांच्या रिक्षा ताब्यात घेऊन लाख रुपये दंड केला जात आहे. यामुळे रिक्षा चालकांचे जगणे अवघड झाले असून आम्ही व्यवसाय करायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. रिक्षा चालकांनी लायसन, बॅच, परमिट व सर्व प्रकारचे कायदेशीर कागदपत्र काढून ते व्यवसाय करत आहेत. त्यांना व्यवसाय करण्याची पूर्णपणे मुभा असून प्रवाशांना सेवा देण्याचे काम रिक्षा चालक करत आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई होत असेल तर त्याविरोधात आंदोलन करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील सांगण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी माहिती दिली.

वाहतूक कोंडी न होन्यासाठी सरकारी यंत्रणेने रिक्षा चालकांना स्टॅन्ड उपलब्ध करून द्यावे. त्यांना सुविधा पुरवणे हे शासनाचे कर्तव्य आहे. परंतु वाहतूक कोंडीच्या नावाखाली मात्र त्यांना त्रास देऊन त्यांच्या गाड्या दाबून ठेवल्या जात आहेत. ते अत्यंत चुकीचे असून या विरोधामध्ये आवाज उठविणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेऊन मागण्या मांडणार आहे.

– बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button