ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे वाहतूक पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणास सुरुवात

पुण्यात वाहतूक नियम मोडल्यास पाच मिनिटांत पावती

पुणे : देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुणे शहरात आहे. पुणे शहरात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकारही सर्वाधिक आहे. तसेच वाहतुकीचे नियमांना काही वाहन धारक बगल देतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी यादी तयार करण्याचे काम सुरु केले. शंभर आणि पन्नास पेक्षा जास्त वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहे. तसेच आता पुणे पोलिसांनी आणखी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्यास पाच मिनिटांत पावती मिळणार आहे. त्यासाठी दादा, भाऊ…कोणतीही ओळख कामी येणार नाही. कारण ही प्रणाली आता तंत्रज्ञानावर आधारीत असणार आहे.

एआय तंत्रज्ञानानुसार होणार कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम या प्रणालीद्वारे कारवाई होणार आहे. एआय तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे. यामुळे वाहतूक नियमाचे उल्लंघन केले तर अवघ्या पाच मिनिटांत दंडाची पावती मोबाइलवर फोटोसह जाणार आहे. त्यासाठी पोलीस ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नेशन कॅमेऱ्याची मदत घेणार आहेत.

मोबाईलवर पाच मिनिटांत पावती
पुणे पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. सल्लागाराची ही नेमणूक करण्यात येणार आहे. पुण्यातल्या चौका चौकात आधुनिक कॅमेऱ्याद्वारे पुणे पोलिसांची यंत्रणा राबणार आहे. एआय तंत्रज्ञानामुळे कोणी वाहतुकाचा नियम मोडला तर लगेच पुणे पोलिसांना कळणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाच मिनिटांत पावती येणार आहे. यामुळे पुण्यात वाहन चालवताना नियमांचे पालन करावेच लागणार आहे. अन्यथा दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. तसेच वारंवार नियम मोडणाऱ्यांवर परवाना रद्द करण्याची करवाई होणार आहे.

पुणे पोलिसांनी तयार केली ही यादी, आता नियम मोडणाऱ्या वाहनधारकांसमोर मोठे संकट
मागील आठवड्यात पुणे पोलिसांनी यादी तयार केली आहे. शहरात १०० अन् ५० वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांची ही यादी आहे. त्या यादीत १०० वेळा नियम मोडणारे २१ वाहनधारक मिळाले आहेत. तर ५० वेळा नियम मोडणारे ९८८ वाहनधारक मिळाले आहे. त्यांचे परवाना रद्द होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button