breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जुन्नरमधून दहा बिबट्यांचे अखेर गुजरातला स्थलांतर

Pune : जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे  जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले असल्याचे जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले. जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील ‘वनतारा प्राणीसंग्रहालया’त जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून 4 मादी व 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती.

हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मध्ये 5 बिबटे  नेण्याची क्षमता असून दोन ॲंम्ब्युलन्समध्ये 10 बिबटे तर एक ॲंम्ब्युलन्स ही अतिताडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे.

हेही वाचा     –        यूपीएससीची मोठी कारवाई! पुजा खेडकर यांची उमेदवारी रद्द 

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे या तीन ॲंम्ब्युलन्स पोहचल्या. सोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व 23 मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहचले व माणिकडोह व वनविभाग जुन्नर चे 15 अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने लगेचच दिवसभरात 10 बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात  आले. अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे, सहायक वनसंरक्षक जुन्नर, प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे 10 बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले.

या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे. बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 20 ते 25 जणांचे गुजरातचे पथक अॅम्ब्युलन्ससोबत असणार आहे. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय अॅम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबट सुरक्षित पणे ॲंम्ब्युलन्समध्ये चढवले गेले. जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने अॅम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास वा अन्य समस्या उद्भवल्यास ‘ब्रेकडाउन व्हॅन’ ही दिमतीला देण्यात आली आहे. पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये दाखल केले गेले. त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक जुन्नर यांनी सांगितले. जुन्नर वन विभागाने येथील मानव -बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button